Breaking

Tuesday, 16 May 2017

वान्नाक्राय रॅनसमवेअर काय आहे ?

वान्नाक्राय रॅनसमवेअर काय आहे?



          वान्नाक्राय हा एक कॉम्पुटर वायरस आहे. रॅनसमवेअर म्हणजे खंडणीखोर मालवेर.गेल्या शुक्रवारला दि.१२/५/२०१७  ला हा सायबर हल्ला जगभरात घडून आला.हल्लेखोरांनी अमेरीकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेतील सायबर सुरक्षा एजन्सी (एनएसए) चा हकिंग टूल वापरून हा हल्ला केल्याचे सायबर तज्ञ सांगताय.हा दहा वर्षांतील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्या असून आता पर्यत जगभरात याने धुमाकूळ घातलेला आहे.हल्ल्याची सुरुवात हि नेशनल हेल्थ सर्विस युके ला झाली आणि  काही तासांमधेच जगभरातल्या दवाखने ,कंपनी, सरकारी ऑफिस यांवर वानाक्रयचे पडसात दिसयला लागले.
          तसेच ‘वॉन्नाक्राय’ हा रॅनसमवेअरमुळे दीडशेपेक्षा जास्त देशांतील २ लाखांहून अधिक कम्प्युटर यंत्रणांवर परिणाम झाला आहे. या रॅनसमवेअरकडून मायक्रोसॉफ्टच्या 'विंडोज एक्सपी' या प्रणालीला (ऑपरेटिंग सिस्टीम) लक्ष्य करण्यात येत आहे.हा सायबर हल्ला भाविष्यातील सायबरवार चे संकेत आहे.
   
वान्नाक्राय नेमक काय करतो ?

वान्नाक्राय हा रानझोमवेअर कॉम्पुटरमध्ये शिरकाव केल्यावर तुमचा सर्व माहिती इनक्रिप्ट करतो आणि हल्लेखोरांकडून रॅनसमची अर्थात पैस्यांची मागणी केली जाते हि , मागणी बीटकॉइन च्या स्वरुपात मागितली जाते आणि माहिती दिक्रिप्ट करून दिली जाते. हौकेर्स यासाठी ३०० बीटकॉइन ची मागणी करतात म्हणजे 3.25 करोड़ रुपए. पण माहितीनुसार पैसे दिल्यावरही तुमची माहिती तुम्हाला मिळेल याची शास्वती नाही.

वान्नाक्राय वायरस कसा येतो ?

 १.वानाक्राय हा एखादा इ-मेल सोबत येऊ शकतो.इ-मेल सोबत एक अटटेच्मेंट येते ती इयेक्सइ (exe)        किंवा झिप (Zip) या स्वरूप मध्ये असते तीला उघडल्यावर याचा प्रभाव कॉम्पुटरवर होतो आणि सर्व         माहिती इनक्रिप्ट होते.
 २.जर तुम्ही नेटवर्क मध्ये जोडलेलं असाल आणि त्या नेटवर्क मध्ये एखद्या कॉम्पुटर ला जर या वायरसची         लागण झालेली असेल तर हा वानाक्राय नेटवर्क मधून तुमच्या कॉम्पुटर पर्यत हि येऊ शकतो.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या 'वॉन्नाक्राय' या रॅनसमवेअरच्या हल्ल्यापासून बचावासाठी काय करायला हवे ?

१. तुमची प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम ) अद्यावत करून घ्या .
२. मायक्रोसॉफ्टने दिलेलं इमेरजनसी सिक्युरीटी पाट्च इंस्टाल करू घ्या.
३. SMBv1 अक्षम करा. 
४. प्रभावी ऍण्टीवायरसचा वापर करा.
५. बाजारात ऍण्टीरॅनसमवेअर सुद्धा उपलब्त आहेत. 
६. वेळोवेळी आपल्या माहीतीचा बॅकअप करुन घ्या.

No comments:

Post a Comment