Breaking

Friday, 28 April 2017

गूगलचा Gboard आता मराठीत !

                          गूगलने भारतातील अधिकाधिक लोकांना ऑनलाइन येण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने आज बर्‍याच नव्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे भारतीय भाषांमध्ये मशीन लर्निंगची सोय!
 न्यूरल मशीन भाषांतर आता नऊ भारतीय  झालं आहे - हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली, पंजाबी आणि गुजराती.

न्यूरल मशीन भाषांतरामुळे  भाषांतराचा दर्जा सुधारला जातो आणि वेगसुद्धा वाढतो. या मध्ये वाक्य भाषांतरीत होतात  यामुळे मोठ्या प्रमाणावर भाषांतर करणे शक्य झाले आहे आता सर्व काही आपल्या मातृभाषेत!


गूगल ट्रान्सलेटचा जगभरापैकी भारतात सर्वाधिक  वापर केला जातो.  गूगलच्या म्हणण्यानुसार न्यूरल नेटवर्कना भाषांतर करण्यासाठी १० सेकंद वेळ लागायचा आता ०.२ सेकंदावर आणला आहे!

  Download :

Gboard ची वैशिष्ट्ये :

१. कुठल्याही अॅपमध्ये टाईप करता करताच इंटरनेटवर हव्या त्या गोष्टीचा सर्च करता येतो

२. समजा व्हॉटसअॅपवर चॅट व्हीडीओ शेअर करायचा आहे, तर व्हॉटसअॅपमध्येच किबोर्डवर सर्च करून ती लिंक लगेच पोस्ट करता येते. आहे न कमाल !

३. इमोजी शोधता येतात. टाईप केलेल्या मजकुरावरून ईमोजी आपोआप सुचवल्या जातात!

४. GIF  ऍनिमेशन्स किबोर्डमध्येच सर्च करून जोडण्याची सोय!

५. टाईप करता करता भाषांतर करण्याची सोय!


६. रंगसंगती/थिम्स उपलब्ध, आयफोन व अँड्रॉइड दोन्हीसाठी उपलब्ध!

७. आता मराठीमध्येसुद्धा उपलब्ध (१२० हुन अधिक भाषा एकाच कीबोर्डमध्ये!)

८. ट्रान्सलिटेशन सपोर्ट म्हणजे "Google" असं स्पेलिंग टाईप केल्यास "गूगल" असे टाईप होईल!

९. हा कीबोर्ड जसजसे टाईप कराल तसतसं शिकत जातो आणि अधिक सहज शब्द सुचवतो जेणेकरून टायपिंग अधिक सोपं आणि लवकर होतं!

अधिक मराठी पोस्ट साठी लाईक करा शेर करा .. आपल्याला हव्या असलेल्या कुठल्याहि टेक्नॉलॉजी संबंधीत पोस्ट साठी कम्मेंट करा..

No comments:

Post a Comment