Breaking

Friday, 29 April 2016

संगणकावरून मोबाइलला इंटरनेट जोडणी करायची आहे?

तर ते कसे करता येईल? ??


सामान्यत: मोबाइलवरून डेस्कटॉपवर इंटरनेट जोडणी अनेक जण करत असतात.
मात्र डेस्कटॉपवरून मोबाइलवर इंटरनेट जोडणी करावयाची असेल तर तुमचा अँड्रॉइड मोबाइल हा
 रूटेड असायला हवा.
जर तो रूटेड असेल तर तुम्ही डेस्कटॉपवरील इंटरनेट मोबाइलवर वापरू शकता.
यासाठी सर्वप्रथम तुम्ही मोबाइल संगणकाशी जोडा. यानंतर सेटिंग्जमध्ये जा.
तेथे अ‍ॅप्लिकेशन्स हा पर्याय निवडा. त्यानंतर डेव्हलपमेंटचा पर्याय निवडा. यानंतर यूएसबी डबिंग
 असा एक पर्याय असेल तो सुरू करा.


संगणकावर अँड्रॉइड टूल इंटरनेटवरून डाऊनलोड करा.ते डाऊनलोड केल्यावर झिप फाइल एक्सट्रॅक्ट करा.
 यानंतर तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर अँड्रॉइड टूल. ईएक्सई (Android tool.exe) असा पर्याय येईल.
 तो रन करा.
 त्यानंतर सिलेक्ट डिव्हाइस असा पर्याय येईल, यामधून तुमचे उपकरण निवडा.
 त्यात डीएनएस निवडा. यानंतर समोर येणाऱ्या ‘स्टार्ट’ या बटणावर क्लिक करा.
 यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये काही अ‍ॅप्स डाऊनलोड होतील.
 •ते डाऊनलोड झाल्यावर तुमच्या मोबाइलवर ‘यूएसबी टनल’ असा पर्याय दाखवणारा बॉक्स येईल.
  त्याला परवानगी द्या.

तुमच्या मोबाइलमध्ये इंटरनेट सुरू होईल.



* इंटरनेट वापरत असताना कदाचित तुम्हाला ‘नो नेटवर्क कनेक्शन’ असा संदेश येईल, पण त्याकडे लक्ष देऊ नका. तुमचे इंटरनेट चालू राहील. - 



AaiNa jar tumacaa smaaT-faona ha AaoTIjaI sapao-T krt Asaola tr tumhI AaoTIjaI Tu la^na yaa
 maaQyamaacaa ]pyaaoga k$ Saktat.

AaoTIjaI Tu la^nahI eok AaoTIjaI kobala Aaho jaI la^na kobala smaaT-faonalaa jaaoDNyaasa madt
 krto







No comments:

Post a Comment